Author Topic: अभंग मिरची..  (Read 346 times)

Offline mkapale

  • Newbie
  • *
  • Posts: 25
अभंग मिरची..
« on: February 08, 2023, 08:13:56 PM »
जीभेचे चोचले...खाल्ली भाकर नी ठेचा ।
पोट करितें वळवळ दिन रात।।
वाटत असे आहे बहु अंगी बळ ।
एका मिरची ची चळवळ थकवी जिवा ।।

जावे की नाही हिच विवंचना ।
भावना मिश्रीत वेदना नी सुख ।।
रोज करी बेरीज वजाबाकीचे गणित।
एका मिरचीने समीकरण बिघडले ।।

असा प्रसंग कधी वैऱ्यावरी हि ना येवो ।
येती विचार वाईट खाण्या आधी ।।
जितके आत गेले सारे बाहेर ते आले ।
केला प्रचंड कहर ठेच्याने इवल्या ।।

असा लागला मनाला कायमचा तो घोर ।
होऊ लागते चिडचिड नाममात्रे ।।
ठेचा , लाल रस्सा , तळलेली दिसे जरा ।
जीभे आधी पोट माझे गलबले ।।

MK म्हणे बाई तुला मानाचा मुजरा ।
आयुष्यभर तुझा विसर नाही ।।

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):