Author Topic: होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?  (Read 35285 times)

Offline prachidesai

 • Jr. Member
 • **
 • Posts: 117
 • Gender: Female
होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..
नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस

नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू

लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
एरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची भेट

विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या
आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या

रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला
पंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला

निवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते
देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते

'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता..
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता

मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता
'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता..

'सालं नशीबच कंडम' म्हणून पुन्हा पुन्हा रडता
साध्या साध्या कामात शंकाकुशंकाना ओढता

पण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

आपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायची

unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Rahu

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Male


"फ़क्त मग हातावरची भग्यरेषा कधी नाही पहायची... "

शेवट असा असेल तर कसा वाटेल.....
(sorry तुमची कविता alter करतोय..)

राहुल...

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
hath ki lakirope vishvas na karna dost
kyunki
nasib to unkabhi hota hai
jinke hath nahi hote.............
mast aahe kavita
avadali....

Offline sheetal.pawar29

 • Jr. Member
 • **
 • Posts: 67
kay g kiti chan lihile aaehs...mala bhari aawdal...dev tuz bhal karo pori...

Offline nalini

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
sahiiii...

Offline phulpakharu

 • Newbie
 • *
 • Posts: 8
chhan lihil ahe tujhya kavita avadatat mala

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
अप्रतीम जमली आहे कविता
अनंत शुभेछा....

Offline bhagyashri89

 • Newbie
 • *
 • Posts: 4
apratimmmch ahe!!!!!!!     

Offline manish001_78

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Ekdam mast... Apratim...

Offline manoj vaichale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 111
 • Gender: Male
sahich reeeeeeeeeeee