रांगेत उभा असता सुचलेली कविता...
रांगे मध्ये यावे, रांगे मधे राहावे
रांगेस आपले म्हणता, रांगे मधे जगावे.
पुढच्याने छद्मी हसावे, मागच्याने आशेने पहावे
रांगेस मात्र कोणाचे, राग-लोभ नसावे.
रांगत-रांगात रांगेने, हळुवार पुढे सरावे
वेटोळे रांगेच्या शेपटीचे, हलके-हलके सुटावे.
रांगे मधे बसावे, रांगे मधे निजावे
उभ्या पाउली रांगे मध्ये,coffee चे झुरके प्यावे
रांगेत भेटता कोणीसे, हितगुज थोडे करावे
चेहेरे अनोळखीसे, मैत्री मधे जुळावे.
कंटाळा येता रांगेचा, बाहेर भटकुनी यावे
मग येता फिरून रांगेने, ईमाने परत घ्यावें
रांगे मधे आसता, रांगेने रंगात यावे
आपला क्रमांक येता, रांगेने बंद व्हावे!
रांग बंद होता, थैमान मोकळे घालावे
दुसऱ्या दिवशी परतोनी, 'जैसे-थी' रांग पाहावे!
मोह कितीही झाला तरीही, रांगेचा नियम न मोडावा
'देर सही, अंधेर नही', रांगेचा ध्यास न सोडवा!!
रवी जोशी,
१४ ऑक्टोबर २०१०