सहजीवन
आमच्या सुखी आणि समृद्ध जीवनाचं
मधुर पक्व फळ
चाखतमाखत खातोय आम्ही
गेली चाळीस वर्षे
याचं रहस्य ?
अहो रहस्य कसलं त्यात?
आमच्या घरात नेहमीच घडतं
माझ्या इच्छेप्रमाणे
जेव्हा एकमत असेल तेव्हा---!!
आणि घडतं त्यांच्या इच्छेप्रमाणे
जेव्हा दुमत असेल तेव्हा-----!!!!!
उज्ज्वला केळकर.
(रोहिणी दिवाळी अंक--२०१०)
-------------------