मराठी माणुस
घडाळ्याचा गजरावर ताडकन उठतो,
टीव्ही पाहत रात्री नकळतच झोपतो,
नित्यकर्म सांभाळतच,दिवसभर थकतो,
एक चाकोरीबद्ध आयुष्य हा प्राणी जगतो.
चोपडे पणा याला जमत नाही,म्हणून उगाच मान नाही डोलत,
स्वतःचा फटत्कल्पणाचाच याला अभिमान,कारण कधी खोट नाही बोलत,
गुप्त शत्रूंपासून नेहेमीच बेसावध,कारण आपल्याच विश्वात गर्क,
म्हणूनच उद्योग धंद्याचा यथास्थित जगात,सदैव ठरतो मूर्ख.
याला न हाय वे,न लिंक रोड,फक्त एक न संपणारा सरळ रस्ता,
ऑफिस मध्ये बॉसच्या व घरी बायकोचा नियमित खाणे खस्ता.
या गर्दी धक्यात कधी यालाही वाटत,कि एक गाडी घ्यावी,
रोज तर पांचट ताक पितोच,कधी लास्सीही प्यावी.
जातीचा याला अति बाणा,जणू सात जन्माचा नवाबी,
काळ्याशार भविष्याच्या अंधारात रंगवितो स्वप्नं गुलाबी
रसरशीत आयुष्य सुकवून,घालवतो सगळे सत्व ,
समृद्धीची चवच नसल्याने,खातो पोळीशी तत्व.,
मैफिल याची चहा वा पान टपरी,कारण इकडेच काय तो मिळतो मानाचा मुजरा,
ओल्या मनाची रसिकता याची,नाही विसरत आणायला बायकोला गजरा.
चाळून काढतो अख्खे आयुष्य,वेचण्यात सुखसमृद्धीच्या अणू रेणुस,
अल्प संतुष्टी जगावेगळा,हा एकच मराठी माणूस.
चारुदत्त अघोर.