Author Topic: घड्याळाचे काटे  (Read 5637 times)

Offline gojiree

  • Newbie
  • *
  • Posts: 47
घड्याळाचे काटे
« on: March 20, 2011, 05:25:18 PM »
६ वाजले गजर झाला
घड्याळातले काटे उठले
लवकर सर्व आवरून दोघे
६.३० वाजता भेटले

७.३५ ला जॉगिंग करून परतले
८.४० ची पकडली लोकल
ह्या गडबडीत तास काट्याचा
चष्मा विसरला बायफोकल !!!

९.४५ ला ऑफीस गाठले
धापा टाकत केला ब्रेकफास्ट
जागेवर जाऊन बसतात एवढ्यात
ऑफिसात आला बोस खाष्ट

पुन्हा भेटले दोघे
१०.५५ ला कोफी घेताना
१२.०० पुन्हा एकदा
लंच टाईमला जाताना

१.०५ ला कॉन्फरन्स
आणि २.१० ला meeting
३.१५ ला भेटून दोघांनी
चहा घेतला कटिंग

४.२० ला ओढली सिगारेट
५.२५ ला ऑफीस सोडले
गर्दी मधून घरी येताना
उभे राहून पायच मोडले

दमून दोघे झोपी गेले
बंदच पडले घड्याळ
घड्याळाच्या काट्यांचा
हा दिवसभराचा अहवाल !!!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gojiree

  • Newbie
  • *
  • Posts: 47
Re: घड्याळाचे काटे
« Reply #1 on: March 20, 2011, 05:28:34 PM »
ह्या कवितेत घड्याळाचे काटे किती वेळा आणि केव्हा केव्हा भेटतात (एकावर एक येतात) हे वाचताना मजा येईल