तुझ्या पाठी चालताना
तुझ्या पावलांच्या खुणा जपत आलो ,
तू वळलीस अन मुस्कटात दिलीस ,
त्याच रस्त्याने डोळे पुसत घरी आलो .
तू नाही म्हटल्यावर जगुन उपयोग नव्हता .
विष प्यायला एक पैसा खिशात नव्हता ,
विहिरीत उडी मारावी असं वाटलं.
अंग भिजलं असतं अन त्यादिवशी बैल पोळ्यांचा सण होता .
अंगात आलं कि मला तुझी आठवण येते,
नारळ फोडला कि मला तुझी आठवण येते ,
पुजार्याची लेक तू ,
देवळात दिसलो कि पुजार्याला तुझी आठवण येते .
मैत्रेय (अमोल कांबळे)