कोण म्हणत भारत गरीब आहे ....
रॉकेल महागले, पेट्रोल महागले, महागले सर्व काही
रोज नवीन घोटाळे घटती कुंपणच शेत घाई.
कोण म्हणत भारत गरीब आहे .................................
गल्लीतला टपोरी आज नगरसेवक बनला आहे
दुसऱ्याचा खोलीत राहणारा ४ बंगल्यांचा मालक आहे.
कोण म्हणत भारत गरीब आहे ................................
बैलगाडीच्या जागी आता मर्सडीझ आली आहे
शेतकरी कर्जात अन दलाल मलई खात आहे.
कोण म्हणत भारत गरीब आहे .................................
नेते बोलतात भारत महासत्ता बनणार आहे
प्रत्येकाने आपले खाते स्विस बँकेत खोलले आहे.
कोण म्हणत भारत गरीब आहे ...............................
भारत श्रीमंत आहे पण भारतातील लोक गरीब आहेत
श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे
गरीब मात्र पोटासाठी आहोरात्र झटत आहे.
कोण म्हणत भारत गरीब आहे ...................................
अंकुश सोनावणे