Author Topic: जॉनी जॉनी...  (Read 8700 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
जॉनी जॉनी...
« on: April 20, 2012, 03:15:23 PM »
जॉनी जॉनी...

जॉनी हा एक आज्ञाधारक मुलगा,

वडिलांनी अगदी कधीही बोलवले तरीही तो 'यस पप्पा' च म्हणतो

कारण आई-बाबांचे ऐकणे किती हिताचे असते हे तो जाणतो

जॉनी कधीही काही चोरून खात नाही, 

अन क्वचित खाल्लेच तर साखरेपेक्षाही गोड हसून

तो आपल्या मुखातले सत्य उलगडून दाखवतो

अगदी बाळबोधपणे...!

जॉनी काहीही खात असला तरी तो  खोटे कधीच बोलत नाही

कारण त्याला हे ठाऊक आहे की, आपण कितीही खोटे बोललो  तरी 

आपल्या हलणाऱ्या  'जॉ'  नी ते दिसणारच !

नाही का ? 


--- वैभव वसंत जोशी, अकोला
« Last Edit: April 23, 2012, 10:04:08 PM by vaibhav joshi »

Marathi Kavita : मराठी कविता


Haral Gitanjali

  • Guest
Re: जॉनी जॉनी...
« Reply #1 on: April 26, 2012, 08:05:19 AM »
Sir,Kavita  Aavdali ,Khup  aavdali....

vinod s. rahate

  • Guest
Re: जॉनी जॉनी...
« Reply #2 on: October 18, 2012, 01:10:30 AM »
Nice..  Good punch in the end..... ;) ;) ;) ;)