[b]" शब्दांना पाहिलंय कधीतरी हट्टी होताना,
खूप काही बोलायचं असून अबोल - अबोले राहताना,
शब्दांनीच शिकवलंय रडता - रडता हसायला पडता - पडता सावरायला,
शब्दांमुळेच कधी - कधी एखाद्याचा होतो घात,
शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुळे जुळतात मना - मनाच्या तारा,
शब्दांमुळेच चढतो एखाद्याच पारा,
शब्दच जपून ठेवतात त्या गोड - गोड आठवणी,
शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यांमध्ये पाणी..!"[/b]