Author Topic: मरणाशिवाय ना कोणी सोबती माझे.....!!!  (Read 1744 times)

मरणाशिवाय ना कोणी सोबती माझे.....!!!

तू सोडलस अन्,
तुटले नाते दोन जिवांचे,
तू नाकारलेस संपले तेव्हाच,
श्वास माझ्या आयुष्याचे.....

खुप सतावलेस तू मजला,
वचनेही विसरलीस न दुरवण्याचे,
उरलेत फक्त धडकणारे,
ठोके तुटलेल्या ह्रदयाचे.....

बंदिस्त झाले ते मनात,
आभास तुझ्या सुंदर रुपाचे,
सांग कसे गं विसरु मी तुला,
तू दाखलेले जग खोट्या स्वप्नांचे.....

अर्थाचा अनर्थ केलास तू,
भूललीस क्षण सुखाचे,
मर्यादेची सिमा ओलांडलीस,
साधलेस ना डाव मतलबीपणाचे..... 

अखेर माझ्या नश्वर देहानेही,
मध्येच माझी साथ सोडली,
ना दिसली माझी आंसवे तुजला,
ना जाणले कधी तू माझ्या मनाचे.....

सांग कुणाला आपले म्हणू मी,
कुणाला ऐकवू ग-हाणे दुःखाचे,
शेवटी कोणीच राहीले नाही ईथे,
मरणाशिवाय ना कोणी सोबती माझे.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १६/०६/२०१४...
सांयकाळी ०६:११...
©सुरेश सोनावणे.....