किती दिवसांनी पुन्हा ल्याले,
शृंगार अन साज,
नटले मी तुमच्यासाठी,
पुन्हा एकदा आज.........
पाटल्या ल्याले, पैजण पायी,
कंकण हाती किणकिण,
जवळ सख्या तु, शोधी नजर,
का? होऊनी चिनभिन..........
गेले दिवस, आठवं ऊरी ते,
विरह मना सोसवेना,
जवळ सख्या तु, मजसामोरी,
परी नजरेस तु दिसेना.........
तुजसमोर असूनदेखील,
परकी मी तुजसाठी,
विरहदाह सोसवेना मज,
मालविते मी जीवनज्योती.......
तुजसाठी हे जीवन होते ,
संपविते तुजसाठी,
पुन्हा एकदा साज नि शृंगार,
नटले मी तुमच्यासाठी....!!!
दिगंबर