Author Topic: आता असच कसतरी जगायचं !!!  (Read 1720 times)

Offline हणमंत तरसे

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
  • मी राहिलो जरासा आता
आता असच कसतरी जगायचं !!!
« on: December 01, 2011, 12:06:42 PM »
आता असच कसतरी जगायचं !!!

मनाचा दु:खाचा सागर दडपून
चेहऱ्यावरती मोत्याचं हसव आणून
आणि डोळ्यातील आसवाच्या नंदयाना
उलट-उलट वाहून दयायचं
आता असच कसतरी जगायचं !!!

भरनून आलेल्या उंदक्याना
तसचं कसतरी आवरायचं
आणि जरी खर नसलतरी
मोठ-मोठ्यांनी हसायचं
आता असच कसतरी जगायचं !!!

खूप थकलेल्या आयुष्याला
कसबसतरी वाटेवरती आणायचं
आणि थकल्या बाकल्या जीवाला
तसच प्रवासात ताणायचं
आता असच कसतरी जगायचं !!!

मंद होत चाललेल्या धडकाना
कसेतरी श्वासावरती तारायचं
आणि निपचीत स्वपंना
पोरक्या भावनावरती जगवायचं
आता असच कसतरी जगायचं !!!

लुकलुकत्या चांदण्याचा
अंधार उरी घेवून
तसच कसतरी अमावास्याच्या चंद्रासारख
जगाच्या आकाशात उगवायच
आता असच कसतरी जगायचं !!!

..........................................हणमंत तरसे

Marathi Kavita : मराठी कविता