Author Topic: !! ठाऊक होत मला !!  (Read 1238 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
!! ठाऊक होत मला !!
« on: March 01, 2013, 09:30:51 PM »
ठाऊक होतं मला,

मी नसताना तू रडशील..

एकदा का होईना,

आठवण माझी काढशील..

विसरलेल्या सर्व गोष्टींना,

आठवण्याचा प्रयत्न करशील..

आठवेल जेव्हा भेटणं माझं,

तू एकदा तरी हसशील..

माझ्याबरोबर घेतलेला
निरोप,

तू शेवटचा असं म्हणशील..

तो निरोप शेवटचा नव्हताचं,

हे एकदा तरी मान्य करशील..

ठाऊक होत मला,

तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील..

नाही नाही म्हणताना,

तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील..

ठाऊक होतं मला..
                                    : author unknown

Marathi Kavita : मराठी कविता