Author Topic: !! घुसमट !!  (Read 964 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! घुसमट !!
« on: October 12, 2013, 05:02:24 PM »
बातमी तुझ्या गावची
नुसतीच कानी आली !
भरलेली जखम उरीची
पुन्हा भळभळून आली !!

सरीं सोबत पावसाच्या
मृदाही दरवळून गेली !
हूर-हूर मनातल्या मनाची
मनालाच सांगून गेली !!

मोगरा केसांत माळलेला
अलगद मोकळा झाला !
स्पर्शगंध हवा हवासा
सर्वांगात भरून गेला !!

रोमांचक क्षणाचा पिसारा
हलकेच उलगडून आला !
जाणिवेने निसटल्या क्षणांच्या
जीव घुसमटून गेला !!© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता