Author Topic: !! अखेरचे क्षण !!  (Read 1327 times)

Offline Baliram Rathod

  • Newbie
  • *
  • Posts: 1
!! अखेरचे क्षण !!
« on: February 19, 2015, 01:33:14 PM »
मला काय माहीत
तू अशी निघशील....
माझ्याशी प्रेम करून
दुसर्‍याचा हात धरशील.....!

मी समजलो की, माझ्यावर
तु करतेस खुप प्रेम
खरंतर, मी तुला समजलोच नाही
हा होता माझा भ्रम
चालता-चालता वळणावरी
माझा हात सोडशील......मला काय माहीत, तु अशी निघशील..

मी तुझ्या नावे केले
होते माझे जीवन
खरंतर, मला तेंव्हाच कळायला पाहीजे होते
का घेतले उगीचच जिवंतपणी मरण
गोड बोलता- बोलता एका दिवशी
माझ्या ह्रदयाचे छेद करशील....मला काय माहीत, तु अशी निघशील...

तुला बघितल्यावर मला मिळायचे
सार्‍या जगाच बळ
खरंतर, मी समजू शकलो नाही
माझ्या नशिबाला आणि तुला
त्यातही तुझा चालूच होता छळ
छळता- छळता एका दिवशी
सार्‍या जगाशी हरवशील....मला काय माहीत तु, अशी निघशील.....

मी तुला दोष देत नाही
तु तर निरपराधी होतीस
खरंतर, मीच केला होता गुन्हा
आताही माझ्या वेड्या मनाला
आस आहे तुझी
पण चेहरा दिसणार नाही पुन्हा
वाटलं होतं मी मरता- मरता तरी
अखेरच्या क्षणाला फक्त एकदा तरी भेटशील....
मला काय माहीत,
तु अशी निघशील......

- बळीराम राठोड
माहूर.
9545756674

« Last Edit: February 19, 2015, 01:35:37 PM by Baliram Rathod »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Elobangky

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: !! अखेरचे क्षण !!
« Reply #1 on: February 24, 2015, 12:53:15 PM »
We will work together Concomitant obstacles together