Author Topic: आठवण तुझी आली की..!!  (Read 2607 times)

आठवण तुझी आली की..!!
« on: April 23, 2013, 03:04:25 PM »
आठवण  तुझी आली  की
मी  डोळे अलगद  मिटतो
येते   मग  तू   अश्रू  बनुनी  गालांना  माझ्या स्पर्शते
कारण तू  आता आठवण  भेटतेस ...

मी   होतो गप्प  तेव्हा
माझा  श्वास हि  थांबून जातो
मग तेव्हा देहातून  हुंदके  देऊन  मी रडतो
मग  जर  मोकळे वाटतं
कारण तू आठवण बनूनच  राहिलीस

हसत  खेळत  सोबत बसलेलो  ते क्षण 
आता  कागावरून हि  पुसू  लागलेत
कारण   ती प्रेमाची  शाई आज
मला अनंतात  नेऊ लागली
तरी हि  मी  शेवट  बघतो  आहे देह  सोडण्याची
पण तुझी आठवण हि माझ्या  रस्त्यात  येउन थांबली ....

आज  तुझी आठवण  आली की म्हटले
 खरच  डोळे   मिटून घ्यावं
तू निघून  जाण्या आधीच मग
श्वासांनी  देह  सोडून  द्यावा ....

शेवट हि माझा  मग तुझ्या आठवणीतच  होऊन  जावा ....
शेवट हि माझा  मग तुझ्या आठवणीतच  होऊन  जावा ...!!

© प्रशांत   शिंदे
२३/०४/१३

Marathi Kavita : मराठी कविता