Author Topic: मी जळलो तेव्हा काही आसवे पडली !!  (Read 707 times)

मी जळलो माझ्या  जवळ  काही  आसवे तेव्हा पडली  असतील
 आसवांना   पाहू  शकणार नाही मी
 कारण  त्या  आसवांनीच   
 माझे हात  कधीतरी  धरले असतील
 मी  जाईल निघून   कधीच  पुन्हा दिसणार नाही
 पण .....
 माझ्या आठवणी त्यांच्या  डोळ्यांत
 तसेच  जिवंत मी तेव्हा ठेवल्या असतील.....
 
 मी जळलो  तेव्हा   काही  आसवे  पडली असतील
 मी  निघालो आहे   आज
 काही पाकळ्या  नक्कीच   माझ्यावरती  पडल्या असतील  ....
 
 काही  आसवे नक्कीच  पडली असतील....
 
 © प्रशांत शिंदे
 दि .९-०५-२०१३