Author Topic: दुनियादारी ..!!  (Read 1175 times)

दुनियादारी ..!!
« on: July 11, 2013, 10:43:00 AM »
हातात आता दारूची बाटली दिसत होती
डोळ्यांत पाणी
मी म्हणायचो मला जास्त झाली आहे
पण मित्र म्हणायचे तू दुखात आहे ..

मी एकटाच राहत होतो
कुठल्या तरी कोपर्यात बसलेला सापडत होतो
मी म्हणायचो माझे दिवस भरले आता
ती म्हणायची
बस कर ना आठवणे मला ....

मी शांत झोपत होतो
लोक म्हणायचे किती आहेत दुख याला ....

खरे सांगायचे म्हटले " तर कुणी नाही ह्या जगात मला "..

नास्तिक होतो देव तरी काय करणार
म्हणूनच तर आधी गरीब केलं
आणि मग तिच्यापासून हि दूर केलं होतं मला

मी म्हणायचो नशीब फुटके आहे माझे
नेहमीच हरत असतो
मित्र म्हणायचे ती गेली सोडून तरी साला
अजूनही तिच्यासाठीच रडत असतो ...
काय करणार प्रेम केलं होतं ना मी
मग भोगावे तर लागणार एकटेपण ....

भेटेल पुन्हा कुणी तरी
पण पुन्हा कसा विश्वास ठेवू
पुन्हा कसे प्रेम करू ......

असेच राहू जो पर्यंत आहे ... मग काय संपवून टाकू हे आयुष्य..
-
• ©प्रशांत. डी. शिंदे•

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: दुनियादारी ..!!
« Reply #1 on: July 11, 2013, 11:45:30 AM »
Sahi he...

Re: दुनियादारी ..!!
« Reply #2 on: July 15, 2013, 11:33:39 AM »

Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
Re: दुनियादारी ..!!
« Reply #3 on: July 15, 2013, 07:06:56 PM »
   राग मानू नये ...   पण हातातल्या बाटलीस  सोडा...   

Re: दुनियादारी ..!!
« Reply #4 on: July 17, 2013, 03:56:49 PM »
   राग मानू नये ...   पण हातातल्या बाटलीस  सोडा...   
hahaa... vijaya :P ...  tyachi   ek  wel aste .... :P