Author Topic: अशीच होती एक प्रेमवेडी माझी...!!  (Read 996 times)

अशीच होती एक प्रेमवेडी माझी...!!

मी साखर झोपेत असताना,
नेहमी माझ्या स्वप्नात यायची,
स्वप्नात माझ्या आल्यावर,
खुप खुप मला छळायची......

मी विरोध केला तर,
ती अजुनच माझ्यावर ओरडायची,
आणि मी शांत बसल्यावर,
माझ्यावर खोटं खोटं रागवायची.....

अशीच होती एक प्रेमवेडी माझी...!!

कधी मला जवळ घ्यायची,
तर कधी दूर लोटायची,
मी i love बोलताच,
लाजेने चूर चूर व्हायची.....

कधी कधी मी एकटा असताना,
मला खुप खुप हसायची,
तर कधी न दिसल्यावर,
मला खुप खुप रडवायची.....

अशीच होती एक प्रेमवेडी माझी...!!

खरच ती खुप सुंदर होती,
मला ही ती खुप आवडायची,
तिची ती कातिल भेदक नजर,
ह्रदयाला माझ्या घायाळ करायची.....

मी मरणाच्या गोष्टी केल्या की,
डोळे वटारुन रागाने माझ्याकडे पाहायची,
आणि असे परत जर बोललास तर,
मीच मरेल तुझ्या अगोदर असे बोलायची.....

पण ?????

माहीत नाही कधी आणि कसा,
नशिबाने माझा भयानक घात केला,
माझ्या हाता तोंडाशी आलेला घास,
राक्षसा सारखा हिरावून नेला.....

अशीच होती एक प्रेमवेडी माझी...!!

ती माझी न होता,
कुणा परख्याची झाली,
ती एक ही एक शब्द न बोलता,
मला न सांगता सोडून गेली.....

तीच्या आठवणीत मी अजुनही,
मरत मरत जगत आहे,
ती नेहमी सुखी राहावी म्हणुन,
देवाकडे नतमस्तक होवून प्रार्थना करत आहे..... :'( :'( :'(

तात्पर्य - प्रेमाची खरी किँमत,
प्रेम गमावाल्यावरच कळते.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २१-०८-२०१३...
सांयकाळी ०८,४१...
© सुरेश सोनावणे.....