Author Topic: मी मेल्याने...!!  (Read 1334 times)

मी मेल्याने...!!
« on: September 07, 2013, 08:53:05 AM »
मी मेल्याने,
खरं तर कुणाला काही,
फरक पडणार नाही.....

मी मेल्याने,
खरं तर कुणी माझ्या,
आठवणीत आंसवे पाझरणार नाही.....

मी मेल्याने,
खरं तर कुणी माझ्या,
मयतीवर रडणार नाही.....

मी मेल्याने,
खरं तर कुणाच काही,
माझ्याशिवाय अडणार नाही.....

मी मेल्याने,
खरं तर कुणाच काही,
माझ्यामुळे बिघडणार नाही.....

मी मेल्याने,
खरं तर कुणी माझ्यासाठी,
एक क्षणही झूरणार नाही.....

हजारो लाखो करोडो लोक,
माझ्या अंतयात्रेला येतील,
दोन दिवसात मला विसरुन ही जातील.....

सग्गे सोयरे ही येतील,
जवळ माझ्या खोटे दुःख जतवायला,
माझ्यावर नसलेले प्रेम दाखवायला.....

डोळ्यातून दोन थेंब गाळून,
मला हजार शिव्या देतील,
क्षणातच मला परखा करतील.....

फक्त माझे,
प्रिय आई-बाबाच असतील,
ज्यांना माझ्या आठवणीत अश्रूं आवरणार नाही..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०७-०९-२०१३...
सकाळी ०८,२०...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता