Author Topic: कसं विसरु मी तुला...!!  (Read 1561 times)

कसं विसरु मी तुला...!!
« on: September 15, 2013, 02:01:54 PM »
कसं विसरु मी,
माझ्या मनातल्या तुला,
कसं विसरु मी,
तुझ्या कटू आठवणीँना.....

कसं विसरु मी,
त्या अनमोल क्षणांना,
कसं विसरु मी,
तुझ्या मधाळ हसण्याला.....

कसं विसरु मी,
तुझ्या गोड लाजण्याला,
कसं विसरु मी,
तुझ्या अल्लड वेडेपणाला.....

कसं विसरु मी,
तु मुरडलेल्या नकट्या नाकाला,
कसं विसरु मी,
तु मारलेल्या घट्ट मिठीला.....

कसं विसरु मी,
तुझ्या गही-या डोळ्यांना,
कसं विसरु मी,
तु केलेल्या जिवापाड प्रेमाला.....

कसं विसरु मी,
तु दाखवलेल्या स्वप्नांना,
कसं विसरु मी,
तु कुरवाळलेल्या जखमांना.....

कसं विसरु मी,
तु खाललेल्या शपथांना,
कसं विसरु मी,
तु दिलेल्या खोट्या वचनांना.....

कसं विसरु मी,
तु केलेल्या विश्वासघाताला,
कसं विसरु मी,
तु मोडलेल्या मनाला.....

कसं विसरु मी,
तु तोडलेल्या ह्रदयाला,
एकदातरी सांग ना गं शोना,
कसं विसरु मी तुला.....

कसं विसरु मी तुला..... :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १५-०९-२०१३...
सकाळी ११,३१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

  • Guest
Re: कसं विसरु मी तुला...!!
« Reply #1 on: September 21, 2013, 01:49:59 AM »
कसं विसरु मी,
तु दिलेल्या खोट्या वचनांना.....

कसं विसरु मी,
तु केलेल्या विश्वासघाताला,

``````````````````````````````


असे कसे हे विश्वासघातकी लोक?
देउन खोटी खोटी वचने करती माझा "जोक्‌"
मेणाहुन मऊ "हार्ट" माझे झाले आहे "ब्रोक्‌"
आता उपाय म्ह्णुनी आवरण्या माझा शोक
बसे मी पुरवत शोककाव्य करण्याचा माझा षोक.

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कसं विसरु मी तुला...!!
« Reply #2 on: September 21, 2013, 01:14:44 PM »
nice..... :)