Author Topic: कोणीच कुणाच काहीच लागत नाही...!!  (Read 1986 times)

मनातल्या अबोल भावनांना,
कोणीच का समजत नाही.....

शब्दात लिहलेले दुःख,
कोणीच का जाणत नाही.....

दोन शब्द जिव्हाळ्याचे,
कोणीच का बोलत नाही.....

आपण एकटेपणात रडताना,
कोणीच का सोबत रडत नाही.....

का असे होते नेहमी,
खरच काही कळत नाही.....

आपलेच सोडतात साथ आपली,
परखी कधी आपली होत नाही.....

कुणाला कितीही आपलं करा,
कोणीच कुणाच काहीच लागत नाही.....

कोणीच कुणाच काहीच लागत नाही..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १८-०९-२०१३...
सांयकाळी ०८,४६...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


ashish t

  • Guest
khup chan kavita, ekhadi kavita KATARWEL ya vishayawar lihavi, pls pls.