Author Topic: खोटे प्रेम होते तुझे...!!  (Read 1620 times)

खोटे प्रेम होते तुझे...!!
« on: September 19, 2013, 03:34:49 PM »
खोटे प्रेम होते तुझे...!!

स्वप्नात ही तु आता येऊ नको,
पुन्हा येऊन मला अश्रूं देऊ नको.....

मी मनापासुन तुझाचं झालो आहे,
तु मात्र पुन्हा माझी होऊ नको.....

तुझ्याशिवाय जगणारचं नाही,
तु मात्र माझ्याशिवाय जगुन पाहू
नको.....

मी मेल्यावर एकदा तरी येऊन जा,
पण माझ्या मुडद्याला बिलगुन रडू नको.....

मौल्यवान आहे आयुष्य तुझे,
ते माझ्यासाठी नासवू नको.....

मी तर मेलोचं आहे कायमचाचं
तुझ्यासाठी,
तु मात्र मला आठवून जीव जाळू नको.....

जसे माझ्यावर खोटे प्रेम केलेसं तु,

प्लीज ???

तसे पुन्हा कुणावर खोटे प्रेम करु
नको..... :'( :'(

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


वीणा

  • Guest
Re: खोटे प्रेम होते तुझे...!!
« Reply #1 on: September 23, 2013, 03:16:01 AM »
 « Reply #1 » Re: ही कविता खास तिच्यासाठी...!!

    Quote:

श्री. सुरेश सोनावणे,

तुमच्या सगळ्या कवितांमधून तुमची बर्‍याच प्रमाणातली आत्मसंभ्रमावस्था --delusional mental state-- स्पष्ट दिसत आहे. त्या अवस्थेतून लवकर बाहेर पडण्यासाठी कोणा तरी जाणकाराची तुम्ही मदत घ्यावीत. त्या अवस्थेतून तुम्ही बाहेर पडण्याबद्दल माझ्या हार्दिक शुभेच्छा.