Author Topic: म्हटलं विसरुन जावं तुला...!!  (Read 1992 times)

म्हटलं विसरुन जावं तुला,
तुझा अखेरचा निरोप घेताना,
द्यावी विरहाची तु हार्दिक शुभेच्छा मला,
नाते तोडून एकटं सोडून जाताना.....

म्हटलं विसरुन जावं तुला,
तुझी खुप आठवण काढताना,
खुप त्रास होतोय मनाला,
जिवघेण्या एकांतात जगताना.....

म्हटलं विसरुन जावं तुला,
तु माझा तिरस्कार करताना,
एक एक क्षण जगणं कठीण झालयं,
दुराव्यात जिवंतपणी मरण भोगताना.....

म्हटलं विसरुन जावं तुला,
भावनेशी खेळलेला खेळ आठवताना,
ह्रदयात जखमाच उरल्या आता,
वेदना सहन होत नाही दुःखताना.....

म्हटलं विसरुन जावं तुला,
मनाला मनाने तोडताना,
प्रेमाचा खुप अधीन झालो मी,
मला कसलेही व्यसन जडलेले नसताना.....

म्हटलं विसरुन जावं तुला,
ह्या जगाचे शेवटचे दृश पाहताना,
न सांगता सोडावा अखेरचा श्वास हा,
हसत हसत मरणाला कवटाळताना..... :-( :'( :-/

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २३-०९-२०१३...
दुपारी ०२,२२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

  • Guest
Re: म्हटलं विसरुन जावं तुला...!!
« Reply #1 on: October 06, 2013, 02:10:10 AM »
फेसबुकी "प्रेमा"च्या स्वप्निल दुनियेचा मी रहिवासी

फेसबुकी "प्रेमा"च्या स्वप्निल दुनियेत मी वनवासी