Author Topic: मी मेल्यानंतर...!!  (Read 1850 times)

मी मेल्यानंतर...!!
« on: September 24, 2013, 02:27:02 PM »
मी मेल्यानंतर...!!

माझ्या शरीराला जाळण्या अगोदर,
माझं ह्रदय ठेवा काढून बाजूला.....

खुप दुःख दिले तिने मला,
हे कळू द्या तिच्या मनाला.....

माझी आठवण काढून रडली पाहीजे ती,
प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला.....

माझ्या ह्रदयाशी खेळण्याचा हक्क,
तिच्याशिवाय देऊ नका कुणाला.....

भावनेशी खेळण्यात तरबेज आहे ती,
जखम देत असते नेहमी मनाला.....

होऊ द्या सर्वकाही तिच्या मनासारखं,
ती येण्याआधी जाळू नका माझ्या नश्वर देहाला.....

माझ्या देहाची जळून झालेली राख,
अर्पण नका करु नदीतल्या पाण्याला.....

मरणानंतरही आत्मा भटकत राहील माझा,
तरसत होतोच आणि तरसतच आहे दोन क्षणाच्या प्रेमाला..... :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २४-०९-२०१३...
दुपारी ०२,२१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Rahul Gaikwad

  • Guest
Re: मी मेल्यानंतर...!!
« Reply #1 on: October 05, 2013, 03:11:22 PM »
EKDAM MAST AHE

सौरभ

  • Guest
Re: मी मेल्यानंतर...!!
« Reply #2 on: October 06, 2013, 12:03:23 AM »

मरणानंतरही आत्मा भटकत राहील माझा

.

.
.
.
मरणानंतरही आत्मा भटकत राहील माझा
कदाचित्‌ कांगारूच्या देहात ऑस्ट्रेलिआमध्ये
कदाचित्‌ मांजराच्या देहात कोरिआमध्ये
कदाचित्‌ हरणाच्या देहात ब्राझीलमध्ये
कदाचित्‌ मंत्र्याच्या देहात दिल्लीमध्ये
कदाचित्‌ साधूच्या देहात देहूमध्ये.