Author Topic: माझ्या प्रेमाची किँमत, कधीतरी कळेल तुला...!!  (Read 1830 times)

खरे प्रेम करुनही जबरदस्त धोका मिळालेल्या एका प्रियकराची व्यथा...!!

माझ्या प्रेमाची किँमत,
कधीतरी कळेल तुला,
वेडीपिशी होऊन तु,
शोधशील मला.....

पण ???

खुप उशीर झाला,
असेल गं शोना तेव्हा,
शोधूनही कधीच सापडणार,
नाही मी तुला.....

जेव्हा खुप रडशील,
जिवाच्या आकांताने,
तेव्हा तुझे वाहणारे अश्रूं,
दिसणार नाही गं मला.....

क्षणोक्षणी झुरत राहशील,
तु आठवणीत माझ्या,
काही केल्या कुठेच,
भासणार नाही मी तुला.....

आपण भेटणा-या नेहमीच्या ठिकाणी,
ये जा करशील तु,
भासांन शिवाय काहीच,
जाणवणार नाही तुला.....

माझे विचार माझे शब्द,
नेहमी सतावतील तेव्हा,
जेव्हा तुझे वचन तुझ्या शपता,
एकटेपणात फसवतील तुला.....

कदाचित त्यावेळी मी,
या जगात नसणार,
या नंतर पुन्हा कधीच,
भेटणार नाही मी तुला.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २४-०९-२०१३...
सांयकाळी ०७,०४...
© सुरेश सोनावणे.....