Author Topic: गेलीस मला जिवंतपणी मारुन...!!  (Read 1174 times)

खुप चांगल केलस,
माझ्याशी Break-Up करुन.....

मनातून खुशी झाली तुला,
माझ्याशी जोडलेलं नातं तोडून.....

खुप छान वागलीस,
गेलीस मला परखं करुन.....

खुप प्रेम केलस माझ्यावर,
खोटं खोटं नाटकी बोलून.....

खुप बरं केलस,
मला एकटं तडफडण्यासाठी टाकून.....

खुप वार केलेस,
चाललीस माझ्या मनावर जखमा कोरुन.....

खुप मस्त राहीलीस,
मला विरहाच्या अग्नीत जाळून.....

खरच खुप खुप आभारी आहे मी तुझा,
तुझ्यावर खरे पण अधुरे प्रेम करुन.....

जगण्याची फसवी आस दाखवलीस,
गेलीस मला जिवंतपणी मारुन.....

गेलीस मला जिवंतपणी मारुन.....
:'( :'( :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २७-०९-२०१३...
दुपारी ०३,०९...
© सुरेश सोनावणे.....