Author Topic: एक स्वप्न होते माझे...!!  (Read 1841 times)

एक स्वप्न होते माझे...!!
« on: September 29, 2013, 08:24:17 PM »
एक स्वप्न होते माझे,
तुला आपले करायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला राणी बनवायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला सर्व सुख द्यायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुझे दुःख माझ्यावर घ्यायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला मनसोक्त हसवायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला स्वप्नात पहायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुझ्या जखमे फुंकर
मारायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला ह्रदयात ठेवायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला लाजताना पहायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला प्रेम रंगात रंगवायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला बहूपाशात घ्यायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला घट्ट मिठीत कवटाळायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला डोळे भरुन पहायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला मनात साठवायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला सुखात ठेवायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला मरणाच्या शेवटी आठवायचे.....

सा-या आयुष्याची झाली माती,
माझे एक स्वप्न अधुरे राहीले,
तुला माझ्या डोळ्यासमोर,
दुस-याची होताना पाहीले.....

आता मनात पक्के ठरवले की,
काहीही करुन तुला कायमचे
विसरायचे,
तुला कधीच न आठवायचे,
तुझ्या आठवणीत नाही रडायचे.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २९-०९-२०१३...
दुपारी ०४,०५...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: September 29, 2013, 08:27:02 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता