Author Topic: आज तिची माझी शेवटची भेट होती...!!  (Read 1145 times)

आज तिची माझी शेवटची भेट होती...!!

आज शेवटच ती मला,
भेटायला आली होती,
डोळ्यात आसंवे लपवत,
मनाला ती सावरत होती.....

का रे असं झालं,
आपल्या नशिबा सोबत,
मला असं म्हणताना,
मनात स्वतःला ती कोसत होती.....

किती रे प्रेम होते तुझे माझ्यावर,
आणि माझे तुझ्यावर,
भिजलेल्या पापणीच्या किना-याने,
मला ती इशारे करत होती.....

कसं रे नकळत जुळल नातं,
अनोळखी तुझं आणि माझं,
अन् आज एकमेकांना परखे झालो,
मनातल्या मनात ती रडत होती.....

किती रे स्वप्ने पहीली,
सारी ती आज धुळीस मिळाली,
विरहाचा एकटेपणा का आला असा,
स्वप्नातही ती माझ्या भोवती घुटमळत होती.....

तुला सोडून आज चालले मी,
तोडली रे साताजन्माची नाती,
नाही विसरणार कधीच तुला,
असं खोटं आश्वासन मला ती देत होती.....

नको रे बिथरुस असा,
सावर रे वेड्या स्वतःला,
माझी चिँता करु नकोस,
माझ्या काळजी पोटी दिलासा देत होती.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०१-१०-२०१३...
रात्री १०,४०...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: October 01, 2013, 11:02:16 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »