Author Topic: व्यथा माझ्या मनाची...!!  (Read 1031 times)

व्यथा माझ्या मनाची...!!
« on: October 03, 2013, 09:49:50 PM »
व्यथा माझ्या मनाची...!!

कधी कधी असं वाटतं,
तुला कायमच जावं सोडून.....

करावा आरपार घात ह्रदयावर
तुझ्या मनाला जावं मोडून.....

मी दिलेली वचने,
क्षणातच जावी तोडून.....

मी खाललेल्या सर्व शपथा,
आपोआप जाव्या विसरुन.....

मी दिलेल्या सर्व आठवणी,
तुझ्या मनातून टाकाव्या पुसून.....

मी साठवलेल्या साठवणी सा-या,
शमशानात राख कराव्यात जाळून.....

मी पाहीलेली सारी स्वप्ने,
धुळधाण करुन टाकावी मिटवून.....

खुप प्रेम आहे माझे तुझ्यावर,
म्हणुनच तु मला थांबवावं हातात हात धरुन.....

मी नसताना अक्षरशा खुप रडशील तु,
नसेल कुठेच गेलो असेल मी मरुन.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०३-१०-२०१३...
सांयकाळी ०८,२८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता