Author Topic: दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तु...!!  (Read 1537 times)

हे देवा परमेश्वरा या जगात,
प्रेम का बनवलस तु,
खरं प्रेम करुन क्षणात संपणारा,
खोटा डाव का मांडतोस तु.....

स्वतःच्या जिवापेक्षा जास्त कोणाला जपुनही,
आपलं कोणी होत नसेल,
तर त्या मतलबी व्यक्तीला,
आयुष्यात का आणतोस तु.....

जर खरं प्रेम करुनही,
विरहच येत असेल वाट्याला,
तर अनोळखी व्यक्तीँना,
जिवलग का बनवतोस तु.....

असेच असते का रे प्रेम,
जे सर्वकाही क्षणात लुटून नेते,
नेहमीच अचानक शेवटी,
आयुष्यात फक्त आठवणीच का ठेवतो तु.....
 
किती रे करु प्रार्थना तुझ्याकडे,
किती रे दया याचना करु,
नेहमी मला सुख देण्या ऐवजी,
पावलोपावली दुःखच का देतो तु.....

एक क्षणाच प्रेम देतोस,
दुस-या क्षणी तरसवतोस,
प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी,
दुःखाच्या दरीत का ढकलतोस तु.....

खरच आज कळलय मला,
दगडी मनाचा आहेस तु,
दगडाचा आहे देह तुझा,
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तु.....

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तु.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०५-१०-२०१३...
सकाळी ०७,४०...
© सुरेश सोनावणे.....