Author Topic: खरं तर तुझ्याशिवाय माझे नाहीच कोण...!!  (Read 2148 times)

ह्या अखेरच्या भेटीत,
आज खरच हरवले,
ते तुझे न माझे अनमोल,
न विसरता येणारे क्षण.....

आज पुन्हा का ?
ढसाढस रडू लागलो मी,
नकळत बेभान होवून,
भरुन आले माझे मन.....

तुच होतीस मला,
समजुन घेणारी,
आता मला समजुन,
घेतच नाही कोण.....

आता खरं तर हसणेच,
विसरलो आहे मी,
रडूच येते नेहमी,
तुझ्यासारखे मलापण.....

कितीही विसरायच,
ठरवलं मी तुला,
तर आठवतात ते,
तु सोबत असलेले प्रेमळ क्षण.....

आता माझे कोणीच,
आपले उरले नाही,
खरं तर तुझ्याशिवाय,
माझे नाहीच कोण.....

खरं तर तुझ्याशिवाय,
माझे नाहीच कोण.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०७-१०-२०१३...
दुपारी ०४,३४...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!

Sunil N kundhare

 • Guest

एक हितचिंतिका

 • Guest
माझा ब्रेकअप झाल्यानंतर
१४ फेब्रुवारी २०१२ ला
मी माझ्या प्रियासीला व्हेंलनटाईन
डे Wish
करण्यासाठी
फेसबुकवर केलेला शेवटचा मेसेज.....

मलाचं माहित नाही मी रोज,
कसा जगण्याचा प्रयत्न करतोय,
तुला न आठवावे म्हणुन
स्वःताला नेहमी बिझी ठेवण्या प्रयत्न
करतोय.....

काय माहीत ?
माझ्या सोबत का असे झाले,
ज्यांना आपले म्हटले,
तेचं आज मलाचं परखे झाले.....

किती प्रेम करतो मी तुझ्यावर,
हे तुला कधीचं कळणार नाही,
माझे खरे प्रेम आहे तुझ्यावर,
टाईमपास किँवा पोरखेळ नाही.....

तु सुध्दा माझ्याशी,
परख्यासारखी वागलीस,
एका चुकीच्या निर्णयाने,
माझा त्याग करुन निघून गेलीस.....

रोज रात्री झोपण्यापुर्वी आणि सकाळी,
देवा मला दुसरा दिवस दाखवु नकोस,
अशी नेहमी प्रार्थना करतोय.....

रोजचं तुझ्या आठवणीत झुरतोय,
रोजचं तळमळतोय,
रोजचं धडपडतोय,
अडखळतोय तळमळतोय तडफडतोय.....

रोजचं रडत रडत
स्वतःला फसवण्याचा,
अर्थहीन निरुपयोगी प्रयत्न
करतोय,
रोजचं झिरपनारे अश्रूं पितोय.....

मी तुझ्यावर खुप खुप प्रेम
करतो गं,
जसे काल करत होतो,
तसे आजही करतोय,
" I LOVE YOU...
मी तुझ्याशिवाय नाही जगु शकत.....

यानंतर तिने मला,
" SAME TO YOU बोलून,
BLOCK केले.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १४-०२-२०१२...
रात्री ००,०९...
© सुरेश सोनावणे

22222222222222222

श्री. सोनावणे,

भावनातिरेकाने प्रदीर्घ काळ --निदान २२ महिने-- दिवसरात्र एकाच विचारात मग्न राहण्यात काहीतरी "दिव्य, उदात्त" आहे ही कल्पना पार चुकीची आणि वास्तविक घातक असल्याचे लक्षात घेऊन आणि पुढच्या साठसत्तर वर्षांच्या आयुष्याचा विचार करून मनाचा समतोलपणा प्राप्त करून घेण्याकरता एखाद्या मानसोपचारविशारदाची मदत तुम्ही घ्यावीत असे मी आग्रहाने सुचवते.   

- एक हितचिंतिका