Author Topic: व्यथा माझ्या फुटक्या नशिबाची...!!  (Read 1372 times)

व्यथा माझ्या फुटक्या नशिबाची...!!

काय सांगू अबोल भावना,
माझ्या कोवळ्या मनाची.....

सगळ्यानसाठी मी आहे,
मला साथ नाही कुणाची.....

सगळ्यांच्या सुखासाठी धावपळ करते,
जाणीव नाही कुणाला माझ्या दुःखाची.....

आयुष्यात फक्त तिरस्कार सोसला,
राखरांगोळी केली माझ्या स्वप्नांची.....

प्रत्येकाला दिला आधार मी,
कुणाला काळजी नाही मी निराधार होण्याची.....

सारे आपले परखे झाले मला,
वाट पाहत आहेत माझ्या मरणाची.....

सा-यांना मी नको नकोशी वाटते,
कुणालाच गरज वाटत नाही माझ्याशी नाते जोडायची...... 

प्रेम ही मिळेनासे झाले मला,
हीच व्यथा आहे माझ्या फुटक्या नशिबाची.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०८-१०-२०१३...
सांयकाळी ०७,५७...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Sunil N kundhare

  • Guest
Khupch chhan bhau