Author Topic: आता मन करतच नाही...!!  (Read 1304 times)

आता मन करतच नाही...!!
« on: October 14, 2013, 10:59:43 PM »
आता मन करतच नाही,
तुला पुन्हा पहायला,
तुझ्या मिठीत यायला,
तुझ्या कुशीत शिरुन रडायला.....

आता मन करतच नाही,
तुझ्या आठवणीत झुरायला,
तुझी वाट बघायला,
तुझ्या प्रेमात अखंड बुडायला.....

आता मन करतच नाही,
तुला वेडी होवून शोधायला,
तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायला,
तुला पुन्हा परत बोलवायला.....

आता मन करतच नाही,
तुझी सोबत मागायला,
तुझ्यात एकरुप व्हायला,
मला तुझ्या डोळ्यात निहाळायला.....

आता मन करतच नाही,
तुझ्या स्वप्नात रमायला,
तुझ्या काँलची वेटीँग करायला,
तुझ्याशी मेसेज चँटवर बोलायला.....

आता मन करतच नाही,
मी तुझीच आहे म्हणायला,
तुला माझ्यात समवायला,
तुझ्या ह्रदयात रहायला.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १४-१०-२०१३...
रात्री १०,४७...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pratej10

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Female
Re: आता मन करतच नाही...!!
« Reply #1 on: October 15, 2013, 11:07:53 AM »
Khoop chan

Akash kamble

  • Guest
Re: आता मन करतच नाही...!!
« Reply #2 on: October 18, 2013, 08:15:12 AM »
Chan ahe