Author Topic: प्रेम केल्याशिवाय कधीच कळत नाही...!!  (Read 1138 times)

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
नको ते प्रयत्न केले मी,
पण तुला विसरताच आले नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न आठवावं मी तुला,
पण आठवल्याशिवाय करमत नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न रडावं तुझ्यासाठी,
पण रडल्याशिवाय झोपच येत नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न झुरावं तुझ्यासाठी,
पण झुरल्याशिवाय राहवत नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न गुंताव तुझ्यात,
पण गुंता काही केल्या सुटत नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न फसावं प्रेम जाळ्यात तुझ्या,
पण एकदा फसल्यावर माघार घेता येत नाही.....

कारण ???

प्रेम केल्याशिवाय कधीच कळत नाही.....

प्रेम केल्याशिवाय कधीच कळत नाही.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १५-१०-२०१३...
सांयकाळी ०८,१६...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: October 15, 2013, 09:50:30 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »