Author Topic: खरं प्रेम कुणाला कुणावर करता येत नाही...!!  (Read 1086 times)

प्रेमभंगाने तुटलेल्या ह्रदयाला,
का कधी सावरता येत नाही.....

मोडलेल्या कोवळ्या मनाला,
का कधी जोडता येत नाही.....

कसे विसरतात कोणी कुणाला,
हे कुणालाही सांगता येत नाही.....

प्रेम हे फक्त प्रेम असते,
प्रेमावर कुठलेच बंधन लाधता येत नाही.....

पण ???

हल्ली प्रेम फक्त नावालाच उरलय,
खरं प्रेम कुणाला कुणावर करता येत नाही.....

खरं प्रेम कुणाला कुणावर करता येत नाही.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १६-१०-२०१३...
सांयकाळी ०८,१९...
© सुरेश सोनावणे.....