Author Topic: ती खुप बदलली आहे रे...!!  (Read 1352 times)

ती खुप बदलली आहे रे...!!
« on: October 19, 2013, 11:15:30 PM »
पाहताच क्षणी नजरेत भरणारी,
कातिल अदेने घायाळ करणारी,
मनात घर करुन राहणारी,
ह्रदयात ठान मांडून बसणारी.....

कधी मला पाहून गोड लाजणारी,
कधी मध्येच खळखळून हसणारी,
कधी हक्काने रागवणारी,
कधी कडकडून भांडणारी.....

ती खुप बदलली आहे रे...!!

कधी स्वप्नात येऊन सतवणारी,
कधी good morning बोलून
मला उठवणारी,
कधी रात्रभर
जागवणारी,
कधी मनसोक्त गप्पा मारणारी.....

कधी i hate u बोलून छळणारी,
मी i love u म्हणताच मिठीत
घेणारी,
कधी love u बोलताच
same 2 u म्हणणारी,
कधी i like u म्हणुन आवडणारी.....

ती खुप बदलली आहे रे...!!

कधी माझ्यावर जीव ओवळणारी,
मला स्वतःच्या जिवापेक्षा जास्त
जपणारी,
मरेपर्यन्त साथ
देण्याची वचने देणारी,
ती दिलेली सारी वचने
खोटी ठरवणारी.....

कधी माझ्यासाठी झूरणारी,
मी नाही दिसलो की वेडीपिशी होणारी,
सैराभैरा बेचैन होवून मला शोधणारी,
माझ्या आठवणीने व्याकुळणारी.....

ती खुप बदलली आहे रे...!!

डोळ्यातून सरळ ह्रदयात उतरणारी,
तिच्या असण्याने माझे जग
व्यापणारी,
माझे अस्थित्व विसरायला लावणारी,
माझ्या आवती भोवती घुटमळणारी.....

माझ्या डोळ्यात अश्रूं पाहून
रडणारी,
की आता मला रडवणारी,
माझ्या कवितेला दाद देणारी,
माझ्या प्रेम रंगात रंगणारी.....

ती खुप बदलली आहे रे...!!

माझी बायको होण्याचे स्वप्न
पाहणारी,
मलाच सर्वकाही मानणारी, माझ्यावर
जिवापाड प्रेम करते म्हणुन
फसवणारी,
की आता माझा तिरस्कार
करणारी.....

माझ्या सुखात सुख मानणारी,
माझ्या दुःखात सदैव साथ देणारी,
माझी एक क्षणही सोबत न
सोडणारी,
की आता मला एकटं सोडून
जाणारी.....

आता खरच रे मित्रा,
ती खुप बदलली आहे रे...!!
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १९-१०-२०१३...
रात्री ०९,४०...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Sunil kundhare

  • Guest
Re: ती खुप बदलली आहे रे...!!
« Reply #1 on: October 20, 2013, 08:04:44 PM »
I like
Khup khup chhan kavita kartaat aapan sir