Author Topic: देवा माझे मन दगडाचे कर...!!  (Read 775 times)

देवा माझे मन दगडाचे कर...!!
« on: October 21, 2013, 09:35:01 PM »
एका ब्रेकअप होऊन आयुष्यात पुर्णपणे उध्वस्त झालेल्या,
देवाला प्रार्थनेत साकडे घातलेल्या प्रियकराची व्यथा...!!

देवा माझे मन दगडाचे कर...!!

देवा जमत असेल तर,
माझ्यासाठी एवढं कर,
माझ्या या मनाला,
तु फक्त दगडाच कर.....

खुप दे तु दुःख मला,
बरसु दे पावसाची सर,
तडफडण्याचा शाप देऊन मला,
जिवंतपणी मरण्याचा दे वर.....

सुख नकोच कोणते मला,
रचत रहा वेदनेचे थर,
एकट्यापणाला नको संपवूस माझ्या,
मला अजुन हवे तर एकटा कर.....

नको देऊस मला पुर्ण आयुष्य,
जिवन माझे पुर्णपणे रिते कर,
मी मेल्यावर चिता माझी जळताना,
आत्मा माझा मुठीत धर.....

नश्वर देहाची माझ्या माती होताना,
होणारी राख माझी नाहीशी कर,
नको देऊस हा भयानक विरह मला,
जर तुला शक्य होत असेल तर.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २१-१०-२०१३...
सांयकाळी ०७,५०...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता