Author Topic: मी आजही तोच आहे...!!  (Read 1314 times)

मी आजही तोच आहे...!!
« on: October 26, 2013, 09:32:46 PM »
मी आजही तोच आहे...!!

पहील्या भेटीतच तुला,
आपलसं करणारा,
तुझ्या पाठीमागे येऊन,
डोक्यावर टपली मारणारा.....

तुला किटकँट गिफ्ट देऊन,
गोड गोड बोलणारा,
तुला पहील्यांदा पाहताच,
तुझ्या प्रेमात पडणारा.....

मी आजही तोच आहे...!!

तुझ्या पाणीदार डोळ्यात,
एकटक पाहून स्वतःला शोधणारा,
तुझ्या प्रत्येक सुखासाठी,
स्वतःचा त्याग करणारा.....

तुझ्या एका भेटीची,
आतुरतेने वाट पाहणारा,
तुझ्या अनमोल आठवणीत,
तान्ह्या बाळासारखा रडणारा.....

मी आजही तोच आहे...!!

फोनवर तासनतास, तुझ्याशी गुलूगुलू बोलणारा,
तुझ्या एका मेसेजची,
निरागस डोळ्यांनी वाट पाहणारा.....

तुला आपलं करण्याची,
खोटी स्वप्ने बघणारा,
तु दुःखात असताना,
उसणे हासू आणुन हसवणारा.....

मी आजही तोच आहे...!!

तुझ्यावर जिवापाड,
खुप खुप प्रेम करणारा,
तुझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याची,
माती करुन घेणारा.....

तुला माझी करण्यासाठी,
स्वतःच्या जन्मदात्यांशी भांडणारा,
तुला आपली म्हणताना,
स्वतःच अस्थित्व गमवणारा.....

मी आजही तोच आहे...!!

तु मात्र बदललीस,
माझी मलाच परखी झालीस,
माझ्या भावनांशी खेळून गेलीस.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २६-१०-२०१३...
सकाळी ०७,४१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता