Author Topic: कुणाच्या भावनेशी खेळू नका...!!  (Read 1283 times)

नाही निभवू शकत तर,
कुणाला खोटी वचने देऊ नका.....

नाही सांभाळू शकत तर,
कुणाला आधारचे आमिष दाखवू नका.....

नाही टिकवू शकत तर,
कुणाशी फसवे नाते जोडू नका.....

नाही समजु शकत तर,
कुणाच्या ह्रदयात घर करुन राहू नका.....

नाही सांभाळू शकत तर,
कुणाला स्वतःत गुंतवू नका.....

सर्व काही करा आयुष्यात,
यशाची उंच उंच शिखरे गाठा.....

पण ???

खोटे प्रेम करुन त्याचे मन मोडून,
कुणाच्या भावनेशी खेळू नका.....

नोट : प्रिय मित्रांनो आणि लाडक्या मैत्रिणीँनो,
जर तुम्ही कुणावर खरं प्रेम करत असाल,
तरच कुणाला तुमच्यात गुंतू द्या...
प्लीज प्रेमाला टाईमपास समजुन,
कुणाच्या बारबादीच कारण बनू नका...
ह्रदयाला होणा-या वेदना सहन होत नाही,
आयुष्याची माती होऊन जाते.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २७-१०-२०१३...
सांयकाळी ०६,३८...
© सुरेश सोनावणे.....