Author Topic: मला त्याला विसरताच येत नाही...!!  (Read 1166 times)

ही खास कविता माझ्या एक जवळच्या मैत्रिणीसाठी लिहण्यात आली आहे,
जिने एका मुलावर जिवापाड प्रेम केलं
पण त्या मुलाने तिला धोक्याशिवाय काहीच नाही दिलं.....

माझ्या या एकटेपणाची,
आता त्याला जाणिवच होत नाही.....

प्रेम नावाचे गोड फळ,
माझ्या पदरात पडतच नाही.....

ज्याला तळहाताच्या फोडासारखे जपले मी,
त्याने दुःखाशिवाय मला काहीच दिले नाही.....

खुप प्रेम करत होते मी त्याच्यावर,
त्याला माझे प्रेम कळलेच नाही.....

तो ही इतरांच्या बोलण्याने सोडून गेला,
माझ्या मनातले त्याने जाणलेच नाही.....

किती रडले मी त्याच्यासाठी,
त्याने माझे काही एक ऐकले नाही.....

किती गयावया केलं किती हातपाय जोडले,
त्याने मला समजुनच घेतले नाही......

आता फक्त एक मरणावर विश्वास आहे,
ते ही मला मागूनही मिळतच नाही.....

खुप प्रयत्न मी त्याला विसरण्याचे,
पण मला त्याला विसरताच येत नाही.....

मला त्याला विसरताच येत नाही.....
:'( :( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २८-१०-२०१३...
सांयकाळी ०७,३९...
© सुरेश सोनावणे.....