Author Topic: विसरलीस गं तू...!!  (Read 1181 times)

विसरलीस गं तू...!!
« on: November 27, 2013, 09:19:49 AM »
माझ्या आयुष्यात घडलेली
एक सत्य कहाणी.....

विसरलीस गं तू,
तुझी नि माझी,
ठाण्याला झालेली पहिली भेट.....

विसरलीस गं तू,
जी माझ्या ह्रदयात घर करुन,
बसली होती एकदम थेट.....

विसरलीस गं तू,
त्या दिवशी घातलेला तू,
काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस.....

विसरलीस गं तू,
तेव्हाचे तुझे वा-यावर उडणारे,
काळे रेशमी केस.....

विसरलीस गं तू,
सरळ मनावर वार करणारा,
तुझा एक लाजरी नजर.....

विसरलीस गं तू,
तेव्हाची लोकल ट्रेनची,
होणारी लगबग.....

विसरलीस गं तू,
तुझं चिडून मला नेहमी,
बावळट म्हणनं.....

विसरलीस गं तू,
लटक्या रागात सुद्धा,
प्रेमानं माझी काळजी घेणं.....

विसरलीस गं तू,
तुझी नि माझी,
फेसबुकवर झालेली सेटीँग.....

विसरलीस गं तू,
दोघांनी केलेली माझ्या,
वाढदिवसाला पहिली डेटीँग.....

विसरलीस गं तू,
माझ्या वाढदिवसाला घेतलेले,
प्रेमाचे खोटे वचन.....

विसरलीस गं तू,
मला सतवण्यासाठी,
तुझं मुद्दाम अबोल राहणं.....

विसरलीस गं तू,
माझ्याशी फोनवर,
तासन-तास बोलत राहणं.....

विसरलीस गं तू,
तुला माझं बोलता बोलता,
निशब्द करणं.....

विसरलीस गं तू,
आपल्या होणारे नेहमीचे,
खोटे भांडण मैत्रीचं.....

आणि...!!
आयुष्यभर प्रेमाने,
साथ देण्याचं झालेलं बोलणं.....

खरचं विसरलीस गं तू,
तुझ्यावर जीव ओवाळुन,
टाकणा-या प्रियकराला.....

खरचं,
विसरलीस गं तू.....

खरचं,
विसरलीस गं तू.....
:'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता