Author Topic: आज पुन्हा वाटलं...!!  (Read 1396 times)

आज पुन्हा वाटलं...!!
« on: November 27, 2013, 05:44:43 PM »
आज पुन्हा वाटलं,
तु माझ्याशी थोडंतरी बोलशील,
काही तुझे काही माझे,
मनातले कोडे उलगडशील.....

आज पुन्हा वाटलं,
तु स्वप्नात येशील,
मी तुझीच आहे रे शोन्या,
कुशीत शिरुन म्हणशील.....

आज पुन्हा वाटलं,
तु मला मिठीत घेशील,
बाहूंनी घट्ट कवटाळून,
एक गोड चुंबन देशील.....

आज पुन्हा वाटलं,
जुन्या आठवणीत हरवशील,
प्रेमाची गप्पा गोष्टी करताना,
चेहरा लपवून रडशील.....

आज पुन्हा वाटलं,
नकळत माझं नाव घेशील,
मी तुझ्या सोबत नसण्याने,
अचानक डोळे भरुन येतील.....

आज पुन्हा वाटलं,
एक क्षण तरी मला आठवशील,
माझ्या विचारात गुंतून,
मला आपलसं करुन जाशील.....

आज पुन्हा वाटलं,
माझं मनाचं ओझं कमी करशील,
माझ्या स्वप्नांच्या जगात रंगून,
माझ्या हाती हात देशील.....

आज पुन्हा वाटलं,
कडकडून माझ्याशी भांडशील,
आणि ते भांडण मिटवून,
ओल्या पापण्यांनी sorry बोलशील.....

आज पुन्हा वाटलं,
तु पुन्हा माझ्याकडे परतशील,
अडखळणारे पाऊल माझे,
हक्काने नकळत सावरशील.....
:'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २७-११-२०१३...
दुपारी ०५,०७...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आज पुन्हा वाटलं...!!
« Reply #1 on: November 28, 2013, 11:52:29 AM »
छान ...... :)