Author Topic: आजही आठवते तुझे ते...!!  (Read 986 times)

आजही आठवते तुझे ते...!!
« on: December 03, 2013, 03:42:49 PM »
आजही आठवते तुझे ते,
मला चोरुन चोरुन पाहणे,
मी समोर येताच गप्प गप्प बसणे.....

आजही आठवते तुझे ते,
लपुन छपुन माझ्या मागे येणे,
माझा पाठलाग करुन माझी छेड काढणे.....

आजही आठवते तुझे ते,
मला Msg ने Propose करणे,
माझ्या उत्तराची आतुरतेने वाट पाहणे.....

आजही आठवते तुझे ते,
माझा होकार मिळताच,
आनंदाने वेडेपिसे होऊन बेधुंद नाचणे.....

आजही आठवते तुझे ते,
मला i love u म्हणने,
i love u 2 म्हणताना माझे लाजणे.....

आजही आठवते तुझे ते,
माझ्याशी खोटं खोटं भांडणे,
कानात हळूच Sorry बोलून मला मनवणे.....

आजही आठवते तुझे ते,
माझ्यावर असलेले जिवापाड प्रेम,
रोज माझी वाट पाहणे....

आजही आठवते तुझे ते,
माझ्या एका हास्यासाठी धडपडणे,
माझ्या डोळ्यात बुडून जाणे.....

आजही आठवते तुझे ते,
मागून येऊन मला मिठी मारणे,
गोड चुंबनासाठी लाडात येणे.....

आजही आठवते तुझे ते,
मी नको म्हटले की चिडणे,
I Hate u म्हणुन रागावणे.....

आजही आठवते तुझे ते,
प्रेमाने माझे गालगुच्चे घेणे,
माझ्या कपाळावर मायेणे हात फिरवणे.....

आजही त्या आठवणी आल्या की,
खुप खुप हसते मी,
अन् अचानक तु नसण्याची जाणिव होताच,
नकळत खुप रडते मी.....

तु सोडून गेल्याच दुःख,
अचानक मनात दाटून येतं,
तरीही स्वतःला कसंबसं सावरलय मी.....

बस आता आयुष्यात उरलय,
तुझ्या विरहाच्या आठवणीत,
जिवंतपणी मरण सोसणे.....

जिवंतपणी मरण सोसणे.....
:'(    :'(     :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०३-१२-२०१३...
दुपारी ०२,१३...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: December 04, 2013, 02:05:25 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता