Author Topic: मी ही कुणावर, मनापासून प्रेम केलं होतं...!!  (Read 1296 times)

मी ही कुणावर,
मनापासून प्रेम केलं होतं,
तिला ह्रदय काय पैसा काय अडका काय,
जिवनचं माझं दिलं होतं.....

रात्र रात्र जागायचो तिच्यासाठी,
मर मर मरायचो,
तिनेही मी तुझ्यावर खुप प्रेम करते रे,
असं फसवं उत्तर दिलं होतं.....

मी नेहमी खुप खुप,
खुश असायचो तिला पाहून,
असं काही मनं माझं,
तिच्यावर जडलं होतं.....

ती आली आयुष्यात,
जेव्हा माझ्या,
तेव्हा तिच्यासोबत सुखी संसार थाटायचा,
असं मनोमनी ठरवलं होतं.....

ती ही खुप प्रेम,
करायची माझ्यावर,
तिनेही माझ्यासोबतचं जगण्या मरण्याचं,
खोटं वचन दिलं होतं.....

ती सोडून गेली जेव्हा,
मला बरबाद करुन,
तेव्हा मी तिच्यासाठी हस-या डोळ्यांना,
ढसाढसा रडवलं होतं.....

खुप प्रयत्न केले खुप विनवण्या केल्या,
मी तिला समजावण्यासाठी,
तेव्हा असे वाटले जसे मी,
मरणाला एक क्षणासाठी थांबवलं होतं.....

मी तिला गमावलं,
ती माझ्या नशिबात नाही म्हणुन,
पण ???
तीने आयुष्यात ते गमावलं,
जे फक्त आणि फक्त तिच्यासाठीचं देवाने बनवलं होतं..

खरचं अजुनही ती सोडून गेली,
ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही माझा,

कारण ?????

खरचं तिने प्रेम केलं,
होतं का माझ्यावर,
की देवाने टाकलेलं माझ्यासाठी,
कधीचं न सुटणारं कोडं होतं.....
:'(    :'(    :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):