Author Topic: एका ब्रेक-अप झालेल्या मुलीची व्यथा...!!  (Read 1417 times)

एका ब्रेक-अप झालेल्या मुलीची व्यथा...!!

मीच सांभाळते स्वतःला,
जपते मी माझेच स्वप्न.....

पुन्हा नाही आठवणार मी तुला,
नाही मागणार प्रेम उसणं.....

नको देवूस कोणतेच उत्तर आता,
नाही विचारणार वायफळ प्रश्न.....

स्वतःला सावरेल धडपडत कशी बशी,
नाही होणार तुझं पाय पुसणं.....

तुला सोडून एकटी जगेल मी,
नाही बनणार तुझ्या हातातलं खेळणं.....

तुझा सगळा राग स्वतःवर काढेल मी,
नाही ठरणार तुझ्या डोक्याच दुःखणं.....

विसरेल तुला मी मनापासून,
नाही जमणार मला तुझ्या विरहाचे दु:ख सोसणं.....

नाही जमणार मला तुझ्या विरहाचे दु:ख सोसणं.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(


_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०९-१२-२०१३...
दुपारी ०४,३४...
© सुरेश सोनावणे.....