Author Topic: शोना किती सोप्प आहे ना तुझ्यासाठी...!!  (Read 1941 times)

शोना किती सोप्प
आहे ना तुझ्यासाठी,
माझ्यावर प्रेम करणं,
खोटी वचने देऊन फसवणं.....

शोना किती सोप्प
आहे ना तुझ्यासाठी,
मला सोडून जाणं,
मला टोचून बोलणं.....

शोना किती सोप्प
आहे ना तुझ्यासाठी,
माझ्याशी परख्यागत वागणं,
माझा अपमान करणं.....

शोना किती सोप्प
आहे ना तुझ्यासाठी,
माझा तिरस्कार करणं,
मला नालायक म्हणणं.....

शोना किती सोप्प
आहे ना तुझ्यासाठी,
माझं ह्रदय तोडणं,
मला मरायच सागणं.....

शोना किती सोप्प
आहे ना तुझ्यासाठी,
मला i love u बोलणं,
अन नंतर i hate u म्हणणं.....

शोना किती सोप्प
आहे ना तुझ्यासाठी,
माझ्या भावनांशी खेळणं,
माझं मन मोडणं.....

आणि सर्वकाही होवूनही,
पुन्हा माझ्या आयुष्यात,
वादळासारखं परतून येणं,
i m sorry बोलून माफी मागणं.....

खरच...!!
शोना किती सोप्प
आहे ना तुझ्यासाठी ???
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक १६-१२-२०१३...
दुपारी ०१,५८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sagar raut

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Male
    • sagar3737
आणि सर्वकाही होवूनही,
पुन्हा माझ्या आयुष्यात,
वादळासारखं परतून येणं,
i m sorry बोलून माफी मागणं.....

mastt

रेखा

  • Guest
असो तू, शोने, निष्ठुर; असो तू खोटारडी
करी लग्न मजशी जरी प्रेम तुझे बेगडी
करायची किती याचना तुझी? पडे मती माझी, गे, तोकडी
वाचलीस नच का मम कवने सारी तू वेडीवाकडी?

रेखा

  • Guest
मी उंदिर, शोने, तू मांजरी
खेळ खेळलीस तू माझ्याशी जरी
कर लग्न मजशी --याचितो मी तरी.
करशील न पुरी याचना मम जोवरी
राहीन करत मी कवने मम तोवरी.

रेखा

  • Guest
मी उंदिर, नशीब माझे कलंदर
निघालीस, शोने,तू बिलंदर
निष्ठुर एक नंबरची मांजर
पण बाळगे, गे, आशा माझी निरंतर
की नशीबच करेल जंतरमंतर
अ‍न्‌ होईल आपले लग्न त्यानंतर!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):