Author Topic: वरात निघाली सये...!!  (Read 865 times)

वरात निघाली सये...!!
« on: December 17, 2013, 04:52:14 PM »
वरात निघाली सये,
तू पाहायला ये,
आपलेपणाचे दोन अश्रूं,
तू वाहायला ये.....

वरात निघाली सये,
तू सावरायला ये,
तुटलेली स्वप्न पुन्हा,
तू जोडायला ये.....

वरात निघाली सये,
तू रडायला ये,
तिरडीवरील नश्वर देहाला,
तू मिठीत घ्यायला ये.....

वरात निघाली सये,
तू झूरायला ये,
प्रेमाची निशाणी म्हणुन,
तू गुलाबाचे फूल वाहायला ये.....

वरात निघाली सये,
तू हसायला ये,
सरणावर विलीन देहाला,
तू दंडवत करायला ये.....

वरात निघाली सये,
तू गुंतायला ये,
माझे मिटणारे अखेरचे श्वास,
तू थांबवायला ये.....

वरात निघाली सये,
तू ऐकायला ये,
मरण आले मजला,
तू कोसायला ये.....

वरात निघाली सये,
तू झिंझायला ये,
मी केलेल्या प्रेमासाठी,
तू आग द्यायला ये.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक १७-१२-२०१३...
दुपारी ०३,१३...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: December 17, 2013, 10:08:12 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता