Author Topic: फक्त तुझ्यासाठीच...!!  (Read 1152 times)

फक्त तुझ्यासाठीच...!!
« on: December 19, 2013, 06:06:39 PM »
फक्त तुझ्यासाठीच...!!

तुझ्यासाठीच शहाणा बनलो होतो मी,
तुझ्यासाठीच मुर्ख ठरलो होतो.....

तुझ्यासाठीच झूरलो होतो मी,
तुझ्यासाठीच तडफडलो होतो.....

तुझ्यासाठीच हसलो होतो मी,
तुझ्यासाठीच रडलो होतो.....

तुझ्यासाठीच भांडलो होतो मी,
तुझ्यासाठीच मानलो होतो.....

तुझ्यासाठीच घडलो होतो मी,
तुझ्यासाठीच अंत पावलो होतो.....

तुझ्यासाठीच संपलो होतो मी,
तुझ्यासाठीच उरलो होतो.....

तुझ्यासाठीच जन्मलो होतो मी,
तुझ्यासाठीच वारलो होतो.....

तुझ्यासाठीच प्रेम केलं होतं मी,
तुझ्यासाठीच नातं तोडलं होतं.....

हे सगळं केलं खुपकाही सोसल होतं मी,
फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच.....
 :'(   :'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक १९-१२-२०१३...
दुपारी ०१,२७...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता